15 जुलै पासून रिव्होल्ट आरव्ही 400ची पुन्हा बुकींग सुरु

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । रिव्होल्ट आरव्ही 400 प्रतिक्षेत असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. पहिल्या टप्प्यात अवघ्या दोन तासात बाईक्स विकल्या गेल्याने कंपनीला बुकिंग थांबवावी लागली होती. मात्र कंपनी ग्राहकांसाठी 15 जुलै दुपारी 12 वाजल्यापासून या फ्लॅगशिप बाईकची पुन्हा बुकिंग सुरु करणार आहे. विशेष म्हणजे रिव्होल्ट मोटर्सने बाईकची किंमत 28,000 रुपयांपर्यंत कमी केल्याने बाईकप्रेमींमध्ये क्रेझ वाढली आहे.

आरव्ही 400 सध्या दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबाद या 6 शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या शहरातील लोकं बाईक बुक करू शकतात. आरव्ही 400च्या पहिल्या बुकींगच्या टप्प्यात रेवोल्टने 50 कोटींच्या बाईक्सची विक्री केल्याचा कंपनीने दावा केला. ज्या नशीबवान ग्राहकांची बुकिंग यशस्वी झाली त्यांची आरव्ही 400ची डिलीव्हरी सुरू झाली आहे. बाईकची डिलिव्हरी हरियाणामधील मानेसर प्लांटमधून सुरू करण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. ग्राहकांना हवे असल्यास ते त्यांच्या बाईकची डिलिव्हरी ट्रॅक करु शकतात. त्यासाठी कंपनीकडून वेहिकल ऑनलाईन ट्रॅकिंगची सुविधा देण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या फेम -2 अंतर्गत अनुदानात वाढ केली आहे. त्याचा फायदा कंपन्यांनी ग्राहकांना दिला आहे. रिव्होल्ट आरव्ही 400वर देखील याचा लाभ मिळणार आहे. कंपनीने या बाईकची किंमत 28,200 रुपयांनी कमी केली आहे. या कपातीनंतर दिल्लीतील बाईकची किंमत आता 90,799 रुपयांवर आली आहे. याआधी दिल्लीत या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1,18,999 रुपये होती. तर अहमदाबादमध्ये ही बाईक 87,000 रुपयांची असेल, त्याआधी याची किंमत 1.07 लाख रुपये होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *