Maharashtra SSC Result 2021: दहावीचा निकाल जाहीर; आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडत ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्णजाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल (Class x Result) जाहीर झाला आहे. एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात (Maharashtra Board) प्रथमच अशा पद्धतीने परीक्षा अशा पद्धतीने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन अधिक नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे करण्यात आले आणि निकाल जाहीर करण्यात आला.

राज्यातून १५ लाख७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांचे गुण शाळांकडून मिळाले, त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९९.९५ आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे.

परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी – १७ लाख ६५ हजार ८९८
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – १५ लाख ७४ हजार ९९४

एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी – ९९.९५ टक्के

निकालाची वैशिष्ट्ये –

– निकालात मागील वर्षीच्या तुलनेत ४.६५ टक्के वाढ
– कोकण विभाग अव्वल, १०० टक्के निकाल
– ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
– नागपूरचा निकाल सर्वात कमी
– यंदाही मुलींचीच बाजी
– राज्यात केवळ ३६८ विद्यार्थ्यांना एटीकेटी

विभागनिहाय टक्केवारी
कोकण – १०० टक्के

पुणे- ९९.९६ टक्के
नागपूर – ९९.८४ टक्के
औरंगाबाद – ९९.९६ टक्के
मुंबई- ९९.९६ टक्के
कोल्हापूर -९९.९२ टक्के
अमरावती – ९९.९८ टक्के
नाशिक – ९९.९६ टक्के
लातूर – ९९.९६ टक्के

पुढील थेट लिंकवर निकाल उपलब्ध –

http://result.mh-ssc.ac.in 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link