SSC website crash : सहा तासांहून अधिक वेळ झाला तरी तरी वेबसाईट डाऊन ; विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केला संताप व्यक्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल बोर्डानं पत्रकार परीषद घेत जाहीर केला. दुपारी एकच्या दरम्यानं दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळणार होता. मात्र, दोन्ही वेबसाईट डाऊन झाल्या. बोर्डानं आता निकालासाठी आणखी काही लिंक जाहीर केल्या आहेत. तर, निकालाच्या वेबसाईट पूर्वस्थितीत येण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असं बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितलं आहे.

बोर्डानं नव्यानं दिलेल्या लिंकही डाऊन

वेबसाईट पूर्ववत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळेल. तब्बल सहा तासांहून अधिक वेळ झाला तरी तरी वेबसाईट डाऊन आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु करण्यासाठी एसएससी बोर्डाचे प्रयत्न सुरु आहेत. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि तांत्रिक सदस्यांची बैठक सुरु आहे. बोर्डानं सध्या आणखी तीन लिंक दिल्या आहेत. मात्र त्याही डाऊन असल्याचं समोर आलंय.

बोर्डानं दिलेल्या नव्या लिंक कोणत्या?

http://115.124.96.221/

http://115.124.96.23/

https://mh-ssc.ac.in/

बोर्डाच्या अध्यक्षांची एनआयसी टीम सोबत चर्चा
दहावीच्या निकालाची वेबसाईट अद्यापही काही ठिकाणी सुरु नाही. गेले साडेपाच तास वेबसाईट हँग झाली आहे. वेबसाईट सुरु कधी होणार यावर बोर्डाकडून कोणतेही ठोस उत्तर नाही. दिनकर पाटील आणि टेक्निकल टीम नॅशनल इन्फर्मेशन सेंटर (एनआयसी) कडे रवाना झाले आहेत.

वेबसाईट डाऊन का झाल्या?
एक वाजता निकाल पाहण्यासाठी खुला केल्यावर सर्व्हरवर लोड आला. फायर वॉलवर गर्दी झाली. त्यामुळं वेबसाईट हँग झाली. 60 हजार निकाल डाऊनलोड झाले. दीड लाख लोक आता वेबसाईटवर आहेत. दोन नव्या लिंक तयार केल्या आहेत. वेबसाईट सुस्थितीत यायला थोडा वेळ लागणार आहे, अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *