लोणावळ्यात जाणार असाल तर हे पहिले वाचा काय आहेत नविन नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । कोरोना काळात पर्यटनस्थळी गर्दी करु नका असं आवाहन वारंवार केलं जात आहे. पण तरीही नागरिकांची मोठ्याप्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. येथे कोरोना नियमांचे पालनही केले जात नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतानाच अशा गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात लोणावळ्यातही हजारो पर्यटकांची गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून नविन नियम लागू करण्यात आले आहेत.

लोणावळ्यात जाऊन पावसाळी विकेंड साजरा करण्याची स्वप्न पाहात असाल तर थांबा. ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.. तुम्ही लोणावळ्यात जाऊ शकत नाही. कारण लोणावळ्यात कलम 144 लागू करत जमावबंदी लागू करण्यात आलीय. तसंच, धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

नविन नियम याप्रमाणे असतील
– 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी

– वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, पोहणे यावर बंदी

– धबधब्याखाली जाणे, प्रवाहात जाण्यावर बंदी

– धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे यावर सेल्फीसाठी बंदी

– धबधबा परिसरात मद्यपानास बंदी

– धोकादायक ठिकाणी वाहनं थांबवण्यास बंदी

– बेदरकार वाहने चालवणे, ओव्हरटेकींगवर बंदी

– कचरा, प्लास्टीकच्या बाटल्या उघड्यावर टाकण्यास मनाई

– महिलांची छेडछाड, टिंगल टवाळी, असभ्य शेरेबाजी खपवून घेणार नाही

– धबाधबा परिसरात 1 कमी जाण्यास मनाई

या ठिकाणी असणार आहेत निर्बंध
भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदीर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा धबधबे, धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *