![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १२ डिसेंबर २०२५ |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
दिवस संमिश्र असेल. भविष्याची फार चिंता करू नका. नातेवाईकांशी मन मोकळेपणाने बोलाल. सकारात्मक विचारांची जोड घ्यावी. उगाचच निराश होऊ नका.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आनंददायी अनुभव येतील. भागीदारीत फार विसंबून राहू नका. आजचा अंतिम निर्णय तुमचा असेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
आज कामाचा थकवा येईल. परंतु आळस झटकून कामाला लागावे. उगाच उदास होऊ नका. कोणावरही अति विश्वास ठेऊ नका. मतभेदाला बळी पडू नका.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
उगाचच रेंगाळत बसून राहू नका. वेळेचा सदुपयोग करावा. एखादे चांगले पुस्तक वाचनात येईल. आवडता छंद पूर्ण करता येईल. जुगारापासून सावध राहावे.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
मनात शंकेला थारा देऊ नका. सकारात्मक गोष्टींचा विचार करावा. शैक्षणिक अडचणी दूर होतील. काही नवीन खरेदी करता येईल. घरात टापटीप ठेवाल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. प्रवासाचा सुखद अनुभव घ्याल. दुचाकी वाहन जपून चालवावे. शंकेचे समाधान करून घ्याल. नसते साहस दाखवायला जाऊ नका.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
मोकळ्या स्वभावाने लोकांचे मन जिंकाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जुन्या कामातून लाभ संभवतो. इच्छे विरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. कौटुंबिक गैरसमज टाळावेत.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
अति संवेदनशीलता दाखवू नका. वाईट गोष्टींकडे लक्ष वेधले जाईल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आपलेच मत खरे कराल. नवीन मार्गांचा विचार कराल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
आजचा दिवस सामान्य असेल. भावांकडून मदत मिळेल. कोणावरही विसंबून राहू नका. खर्चावर नियंत्रण ठेवावे. मोहाळा बळी पडू नका.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
आपल्या क्षमतेचा योग्य वापर करावा. खरेदी करताना सावध राहावे. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल. प्रवासात काळजी घ्यावी.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
कार्यालयीन कामात गोंधळ उडू शकतो. चित्त स्थिर ठेवावे. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. व्यवसायिकांनी नवीन धोरण आखायला हरकत नाही. एकावेळी अनेक कामे हाताळू नका.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
भाग्याची चांगली साथ मिळेल. नवीन गुंतवणूक करता येईल. त्यातून चांगला नफा मिळेल. नातेवाईकांची भेट आनंद देणारी असेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल.