महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । सारा अली खान (Sara Ali Khan) ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या चर्चेत असते. (Sara Ali Khan video viral) यावेळी ती आपल्या इमोजी व्हिडीओमुळे चर्चेत आहे. आज जागतिक इमोजी दिवस आहे. (World Emoji Day) या निमित्ताने तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने सबंध सोशल मीडिया वापरकर्त्यांना इमोजी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
साराने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती विविध इमोजींच्या हावभावाची नक्कल करताना दिसत आहे. हा विनोदी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत तिला देखील इमोजी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.