महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । नाशिक । बहुसदस्यीय प्रभाग समितीतून मतदारांसमोर Voters तीन-चार पर्याय ठेवण्यापेक्षा एक सदस्यीय प्रभाग समिती पद्धत असावी, असे स्पष्ट मत मनसेचे MNS अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी व्यक्त करत शहर विकासासाठी हेच योग्य असल्याचा दावा केला. Raj Thackeray advocates single ward system
तीन दिवसांच्या नाशिक Nashik दौऱ्यावर आलेले श्री. ठाकरे ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृह येथे मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. लॉकडाऊनमुळे Lock Down कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला नाही. गेल्या महिन्यात ते नाशिकमध्ये आले होते, परंतू त्यावेळी खासगी कार्यक्रम असल्याने वेळ देता आला नाही. परंतू दोन दिवसांपासून संघटना मजबुत करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या बैठकांमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.