महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । तेल कंपन्यांनी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. गेल्या आठवड्यात शनिवारी डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती, तर पेट्रोलच्या किमतीत 29 ते 30 पैशांनी वाढ करण्यात आली होती. देशाच्या राजधानीत आज पेट्रोल 101.84 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोल 107.83 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 97.45 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. कोलकातामध्ये पेट्रोलच्या किमती 102.08 रुपये, तर डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर इतक्या आहेत.
मुंबई शहरामध्ये जिथे पेट्रोलची किंमत 29 मे रोजी पहिल्यांदा 100 रुपयांच्या पार पोहोचल्या आहेत. अशातच आज तेलाच्या किमती 107.83 रुपये प्रति लिटर आहे. शहरांमध्ये डिझेलच्या किमतीही 97.45 रुपये आहे. ज्या महानगरांमध्ये सर्वाधिक आहे. देशाच्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती आतापर्यंत 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचल्या आहे.
देशात इंधनदरवाढीच्या सत्राला ब्रेक लागून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी जागतिक स्तरांवर तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूड ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाढ 77 डॉलर प्रति बॅरल झालं होतं, या किमती मागच्या पंधरवड्यात 10 टक्क्यांहून कमी होत 68.85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. जर या किमती आणखी काही दिवसांसाठी 70 डॉलर प्रति बॅरलहून कमी राहिल्या, तर येणाऱ्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट होऊ शकते.