कोकणातील पुरस्थिती पाहता राज्य सरकारचा मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । गेल्या अनेक दिवसांपासून कोकणात पावसाचं (Heavy rain in Konkan) धुमशान सुरू आहे. अतिवृष्टीमुळे कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहे. अनेक भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोकणातील गावांमध्ये सोडण्यात येणारा कोयनेचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय कोयनेतून वीजनिर्मिती तात्पुरती बंद (Temporary shutdown of power generation from Koyne) केली आहे.

पुराची परिस्थिती असताना पुन्हा कोयनेच्या पाण्याची भर नको, म्हणून राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा सुरू होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे कोकणात पूरपरिस्थिती काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
कोकणातील पूरपरिस्थिती पाहता कोयना वीजनिर्मितीनंतर कोकणात सोडण्यात येणार पाणी बंद करण्यात आलं आहे. पुढील तीन दिवसांच्या पावसाचा अंदाज पाहता कोकण आणि कोल्हापूर, सांगलीत प्रशासन सज्ज करण्यात आलं आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आता रौद्ररूप धारण केल्याचं पहायला मिळत आहे. कोकणात (Heavy rain in Konkan) परिस्थिती चिंताजनक झाली असून अनेक शहरांत पाणी शिरले आहे. चिपळूण शहरात (Chiplun City) पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ट नदीला (Vashisht River) पूर आल्याने संपूर्ण पाणी शहरात शिरले आहे. शहरातली सर्व दुकाने, तसेच घरांत पाणी (rain water in houses) शिरल्याचं पहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *