महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । शिर्डी । आज गुरुपौर्णिमेचा Guru Purnima मुख्य दिवस असून साईबाबांच्या Sai Baba शिर्डी Shirdi मध्ये भक्तांविना गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. कोरोना महामारी संकटामुळे गेल्या दुसऱ्या वर्षीही साईबाबांचे मंदिर Temple दर्शनासाठी बंद असल्याने भक्तांविना गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येत आहे. मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साई मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव पार पडणार आहे.
साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज गुरुपौर्णिमाचा मुख्य दिवस आहे. आज साईबाबांच्या काकड आरती ने गुरु पौर्णिमेला सुरुवात झाली. त्यानंतर साईंच्या फोटोची व पोथीची मिरवणूक काढण्यात आली.
मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साई समाधि मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव पार पडत आहे. उत्सवानिमित्त साई मंदिर व मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.