महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । गेल्या काही दिवसांपासून गडगडणारे सोन्याचे आणि चांदीचे भाव (Gold and Silver Prices) वाढायला सुरुवात झाली आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याची (third week of July) सांगता सोन्याचांदीतील तेजीनं झाली. शेअर बाजारात सोनं आणि चांदी यांचा भाव वधारला (Price gained) आणि चढ्या दरावरच बाजार बंद झाले. सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे.
जागतिक बाजारातील तेजीसह सराफा बाजारात सोन्याचा भाव 256 रुपयांच्या तेजीसह 46,698 रुपयांवर बंद झाला, तर चांदीच्या भावातही 662 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. चांदीचा सध्याचा बाजारभाव 66,111 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी सोन्याचांदीच्या भावानं उच्चांक गाठल्यानंतर हे भाव काहीसे घसरले होते. मात्र आता पुन्हा एकदा भाव वाढायला सुरुवात झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं चित्र आहे.