कोल्हापूरात पाणी वाढत असल्याने पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक वळवली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये पाणी वाढत असल्याने महामार्गावरील वाहतूक खेडशिवपूर आणि शिरवळ पंढरपूर फाटा येतून वळवण्यात आलीय. लहान वाहनांना खेडशिवपूर टोल नाक्यावरून पुन्हा मागे जाण्यास सांगण्यात येत आहे.

शिरवळजवळ मोठ्या गाड्याना थांबवण्यात आले आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. खबरदारी म्हणून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना थांबण्याची विनंती पोलीस यंत्रणा करत आहे.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाठार-रेठरे भागात मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. महामार्गावरची वाहतूक आता धीम्या गतीने सुरु आहे. कोणत्याही क्षणी महामार्गावरची वाहतूक बंद केली जावू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *