महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या संततधार पावसामुळे चिपळूण,रत्नागिरी,सातारा, सांगली,कोल्हापूर अक्षरशः उध्वस्त झालेले असून अनेक नागरिकांना आपल्या कुटुंबातील सदस्य गमवावे लागले आहे.
अनेक नागरिकांची घरे वाहून गेलेली असून सद्यस्थितीत त्यांना किराणा किट,चादर,ब्लॅंकेट,ताडपत्री, गोळ्या औषधे, जीवनावश्यक वस्तू आदी वस्तुरूपी मदतीची नितांत गरज असून * राजा शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी चिंचवड व सामर्थ्यप्रबोधिनी पुणे व समस्त नागरीकांच्या वतीने मा.जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्फत ही मदत चिपळूण,रत्नागिरी,सातारा, सांगली, कोल्हापूर येथे पाठविणार आहे.
तरी ज्यांना जे जे शक्य होईल त्यांनी खालील क्रमांकावरती संपर्क करून मदत करावी.
संपर्क क्र. :-
दिनेश देशमुख 9822087171
सुशांत भिसे 9921821335
प्रमोद थोरात 96578 31235
विशाल उबाळे 96071 09999
जलील पठाण 89993 35114
निलेश उपादे 8482812216
जावेद जमादार 8888061652