महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने घसरणारे सोन्याचे दर आता वाढताना दिसत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याची किंमत वाढत असून आज त्यात किरकोळ म्हणजे 10 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 48,080 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,080 रुपये इतका आहे. चांदीच्याही किंमतीत 10 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आता 67,210 रुपये मोजावे लागणार आहेत.
गुरुवारी सोन्याच्या किंमतीत 230 रुपयांची वाढ झाली होती. त्या आधी बुधवारी सोन्याच्या किंमतीत 180 रुपयांची वाढ झाली होती. गेल्या दहा दिवसांचा विचार करता 21 जुलैला 180 रुपये, 22 जुलैला 220 रुपये, 23 जुलैला 30 रुपयांची घसरण झाल्यानंतर पुढचे तीन दिवस सोन्याचे दर स्थिर राहिले. त्यानंतर 27 जुलैला पुन्हा त्यामध्ये 210 रुपयांची घट झाली होती.