या अकरा भाषांमधून करता येणार इंजिनिअरिंग ; PM मोदींची मोठी घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । 29 जुलै 2020 ला देशात पहिल्याच वेळी राष्ट्रीय शिक्षण धोरण ही लागू करण्यात आले होते. आज या धोरणाला लागू होऊन, 1 वर्ष पूर्ण झाले आहे. देशामधील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना Students शिक्षणाचा हक्क मिळावे, तसेच ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. त्यांना अधिक जास्त प्रमाणात प्रगत शिक्षण देण्यात यावे. या धोरणाचा हा मुख्य हेतू होता.

या अंतर्गत आता देशामधील काही राज्यांत इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम मराठी बरोबरच इतर 5 भाषांमध्ये शिकवले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू होऊन, आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi महत्त्वाची माहिती दिलेली आहे. देशामधील सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे.

इंजिनिअरिंग Engineering, कॉमर्स, सायन्स Science अशा मोठ्या आणि ज्ञानाने परिपूर्ण असलेल्या अभ्यासक्रमांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता यावे. हा यामधील महत्वाचे हेतू मानले आहे. मात्र, उच्च शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारचे भाषेचे बंधन नसू नये. विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषे मधून शिक्षण घेता यावे. यासाठी केंद्र सरकार Central Government सतत प्रयत्नशील राहिले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहे.

याचेच एक भाग म्हणून आता देशातील 8 राज्यांमधील 14 अभियांत्रिकी कॉलेजमध्ये 5 भारतीय भाषांत म्हणजेच हिंदी, मराठी, तामिळ, तेलुगू, आणि बांग्लामध्ये अभ्यासक्रम शिकवले जाणार आहे. अभियांत्रिकीच्या कोर्समध्ये 11 भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्याकरिता 1 टूलही विकसित तयार आहे. अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *