आरटीई राखीव जागांवरील प्रवेशासाठी शनिवार पर्यंत मुदत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमधील (Private School) २५ टक्के राखीव जागांवरील सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी (Student Admission) आता शनिवार (ता. ३१) पर्यंत मुदत आहेत. या काळात पालकांना विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. (Deadline for Admission to RTE Reserved Seats is Saturday)

कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. जाहीर केलेल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शनिवारपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. पालकांनी प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे, त्यांच्या छायांकित प्रती, हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट या कागदपत्रांसह शाळेत जावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.

दरम्यान, प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी शाळेत जाऊ नये. निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रिक्त जागांकरिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमानुसार संधी दिली जाणार आहे. त्यासाठी प्रवेशाच्या ‘आरटीई २५ टक्के’ या पोर्टलवर स्वतंत्रपणे सूचना देण्यात येतील, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *