महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या कोरोना निर्बंधातून सूट देण्याबाबतच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच गृहपाठ झालाय, लवकरच निर्णय होईल, असे सांगत निर्बंध शिथिल होण्याचे संकेत दिले आहेत.
राज्यातील निर्बंध हटवण्यासंदर्भात संपूर्ण गृहपाठ झाला असून टास्क पर्ह्स, आरोग्य विभाग व आपत्ती निवारण यंत्रणेसह सर्वांची मते आली आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी आहे अशा 25 जिह्यांत निर्बंधात सूट देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी जालना येथे बोलताना स्पष्ट केले.