महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । अँड्रॉईड युजर्ससाठी मोठी बातमी आहे. कारण गुगल अशा अँड्रॉईड व्हर्जनमध्ये काम करणार नाही ज्यामध्ये लॉग-इनचे सपोर्ट दिलेले नाही. यामध्ये 2.3.7 किंवा त्यामधील कमी व्हर्जनमध्ये चालणाऱ्या अँड्रॉईड फोनचा यामध्ये समावेश आहे. या डिवाईसमध्ये गुगलचे एकही अॅप काम करणार नाही. हे बदल 27 सप्टेंबरपासून होणार आहेत. ही माहिती कंपनीने ई-मेलद्वारे दिली आहे. आमचे हे पाऊल युजर्सचा खासगी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी उचलण्यात आले आहे, असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, युजर्सच्या फोनमध्ये असलेल्या ब्राउजरच्या माध्यमातून गुगल सर्च ते साईन-इनपर्यंतचा ऑप्शन मात्र मिळणार आहे.