Corona Vaccination : खासगी रुग्णालयांकडे साठा पडून, सरकारी केंद्रांवर मात्र खडखडाट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । संपूर्ण देशभरात कोरोना (Coronavirus in India) महामारीनं थैमान घातलेलं आहे. अशात कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी सरकारकडून लसीकरणावर (Corona Vaccination) अधिक भर दिला आहे. विविध माध्यमांतून नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती अगदीच उलट आहे. कारण, सरकारी लसीकरण केंद्रांवर मागील काही महिन्यांपासून लसींचा तुटवडा कायम आहे. यामुळे, मोफत लसीकरणासाठी (Free Vaccination) नागरिकांना अगदी पहाटेपासूनच रांगेत उभा राहावे लागत आहे. खासगी रुग्णालयांबाबत मात्र हे चित्र अगदी उलट आहे. कारण खासगी केंद्रांवर 41 टक्के साठा (Vaccine Stock at Private Centers) पडून आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील खासगी आरोग्य संस्थांनी खरेदी केलेल्या लशींपैकी तब्बल 24 टक्के साठा हा केवळ महाराष्ट्रातील कंपन्यांनी खरेदी केला आहे. सरकारनं 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी मोफत लशीची घोषणा केली खरी मात्र अनियमित पुरवठ्यामुळे सरकारी केंद्रांवर लशीसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मोफत लसीकरणामुळे सरकारी रुग्णालयातील लसीकरणाकडे नागरिकांचा कल वाढला आहे. तर, खासगी रुग्णालये मात्र लशींची साठेबाजी करत असल्याचं चित्र आहे. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *