पुणे शहराला पाणीपुरवठा करणारं पानशेत धरण १०० टक्के भरले

 112 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । पानशेत Panshet धरण Dam सोमवारी सायंकाळी १०० टक्के भरले. यामुळे रात्री ११ वाजता वीज निर्मिती Power generation करिता ६०० क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात वीज निर्मितीसाठी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्र, पाऊस Rain कमी झाल्यामुळे रविवारी पहाटे हा विसर्ग बंद करण्यात आला होता.

दरम्यान, गेल्या २ दिवसांपासून पावसाचा जोर कमी स्वरूपात असल्याने खडकवासला Khadakwasla धरणामधील विसर्ग रविवारी उशिरा रात्री ८ वाजता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यानंतर खडकवासला रात्रीच्या सुमारास धरण ९५ टक्के भरले होते. पावसाचा जोर बघून मंगळवारी खडकवासला धरणामधून मुठा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आज सोमवार अखेर ४ धरणाचे मिळून २६.८० टीएमसी म्हणजे ९१.९५ टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे.

धरण साखळीमधील ४ धरणाची एकूण साठवण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. आज अखेर धरणात २६.८० टीएमसी म्हणजे ९१.९५ टक्के धरणसाठा झालेला आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांनी यावेळी दिली आहे. आणखी २.३५ टीएमसी पाणी जमा झाले की ४ ही धरणे १०० टक्के भरणार आहेत. दरम्यान खडकवासला धरणामधून सुमारे ४ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले जाणार आहे. ते मोपले असता. जुलै महिना अखेर ४ धरणे १०० टक्के भरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *