Zomato Food Delivery: झोमॅटो ग्राहकांना फ्री डिलिव्हरी देणार, जाणून घ्या फायदा कसा घ्याल?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । अलीकडेच स्टॉक मार्केटमध्ये (Share Market) लिस्टिंग झालेल्या फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने मर्यादित फ्री डिलिव्हरी योजना सुरू केलीय. झोमॅटोचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. त्यांनी युजर्सना झोमॅटो प्रो प्लसचे सदस्यत्व घेण्याचे आवाहन केले. दीपिंदर म्हणाले, “ही सुविधा वापरकर्त्याला मोठा लाभ देणार आहे.”

झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी ट्विट केले की, त्यांच्याकडे 1.8 मिलियन झोमॅटो प्रो सदस्य आहेत. आमचे ग्राहक अनलिमिटेड फ्री डिलिव्हरीची मागणी करत आहेत. त्यासाठी आम्ही निवडक ग्राहकांसाठी आमचे लिमिटेड एडिशन प्रो प्लस मेंबरशिप सुरू करणार आहोत.

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो आपल्या काही खास युजर्ससाठी झोमॅटो प्रो प्लस सदस्यता सुरू करणार आहे. Zomato Pro Plus चे सदस्यत्व भाग्यवान वापरकर्त्यांना आमंत्रणाद्वारे पाठवले जाणार आहे, ज्यासाठी वापरकर्त्यांना अॅप उघडावे लागेल आणि ते पात्र आहेत की नाही ते तपासावे लागेल.

देशातील 41 शहरांमध्ये सेवा सुरू
झोमॅटो एडिशन ब्लॅक क्रेडिट कार्ड धारकांना आपोआप झोमॅटो प्रो प्लसमध्ये अपग्रेड केले जाईल. नियमित वापरकर्त्यांना झोमॅटो अॅपमधून प्रो प्लस अपग्रेड खरेदी करावे लागेल. झोमॅटो प्रो प्लस सदस्यता भारतातील 41 शहरांमध्ये उपलब्ध असेल जिथे झोमॅटो त्याचे प्रो सदस्यत्व देते.

झोमॅटो प्रो हे एक सबस्क्रिप्शन पॅकेज आहे, जे 2020 मध्ये लॉन्च करण्यात आले. हे आपल्या ग्राहकांना रेस्टॉरंट्समध्ये अन्न आणि डिलिव्हरीवर सवलत देते. या महिन्याच्या सुरुवातीला झोमॅटो गोल्डला झोमॅटो प्रोमध्ये अपग्रेड केले गेले, जे डिलिव्हरी तसेच जेवणामध्ये सवलत देते. झोमॅटो प्रो वापरकर्त्यांना अतिरिक्त सूटसह अन्नावर 40 टक्के सूट मिळते. हे ऑर्डरची 20 टक्के जलद वितरण तसेच इतर ऑफर्समध्ये अतिरिक्त सवलत देते. आतापर्यंत झोमॅटोमध्ये 1.8 मिलियन झोमॅटो प्रो सदस्य आहेत. झोमॅटो प्रो सदस्यत्व सध्या 3 महिन्यांसाठी 200 रुपये आणि वार्षिक सदस्यत्वासाठी 750 रुपये आहे. तसेच, झोमॅटो प्रोच्या वापरावर कोणतीही दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक मर्यादा नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *