महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । दुकाने (Shop) सुरू ठेवण्यासाठी सायंकाळी ७ वाजेपर्यंत परवानगी (Permission) मिळावी, या मागणीसाठी व्यावसायिकांनी बुधवारी सायंकाळी चारनंतर दुकाने सुरू ठेवली. परंतु, पोलिस (Police) आणि महापालिकेने (Municipal) त्यांच्यावर कारवाई (Crime) करण्यास सुरवात केली. त्यामुळे काही भागातील दुकाने सायंकाळी बंद झाली. दरम्यान गुरुवारीही सायंकाळी चारनंतर दुकाने सुरू ठेवण्याचा निर्धार पुणे व्यापारी महासंघाने केला आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे दुकाने सायंकाळी चारनंतर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांची मागणी आहे. त्यासाठी बुधवारपासून सायंकाळी चारनंतर दुकाने सुरू ठेवण्याचे पुणे व्यापारी महासंघाने जाहीर केले. त्यानुसार आज शहराच्या मध्यभागातील आणि उपनगरांतील दुकाने सायंकाळी चार नंतर सुरू ठेवण्यात आली होती. परंतु सायंकाळी साडेपाच -सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सुरू असलेल्या दुकानांचे तपशील टिपण्यास सुरवात केली. तसेच त्यांची छायाचित्रेही काढली. दुकाने बंद करण्यासही सांगितले. त्याच दरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानेही शहर आणि उपनगरांतील फेरीवाले, पथारीवाले यांच्यावर कारवाई सुरू केली. त्यामुळे सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर सर्वत्र कडक बंद सुरू झाला.
वेळ वाढविण्याची भाजपची मागणी
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकानाची वेळ रात्री आठ पर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली. यावेळी पक्षाचे सरचिटणीस राजेश पांडे, तसेच दत्ता खाडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, व्यापारी आघाडीचे महेंद्र व्यास, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक आदी उपस्थित होते.
मुळीक म्हणाले, ‘‘दुकाने प्रत्यक्षात सकाळी दहा वाजता दुकाने उघडली जातात. ग्राहकही त्यानंतरच येतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना सहा तासच व्यवसाय करता येतो आणि त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे दुकानांची वेळ वाढवून शनिवार आणि रविवारचा लॉकडाउन शिथील करण्यात यावा.’’