आता मोटारचालक परवाना स्थानिक ट्रेनिंग स्कूलमध्येही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑगस्ट । रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याच्या नियमांत बदल केले आहेत. सरकारने जारी केलेल्या नव्या नियमानुसार वाहन उत्पादक संघटना, एनजीओ आणि खासगी कंपन्यांनाही ट्रेनिंग सेंटर चालविण्याची परवानगी दिली जाणार आहे.

ट्रेनिंगनंतर या संस्थांनाही नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने बुधवारी यासंदर्भात नवी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. यानुसार ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याची नवी सुविधा ट्रेनिंग सेंटरसोबतच प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्येही (RTO) उपलब्ध असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *