BAN vs AUS: कांगारुंची बांगलादेशात दयनीय अवस्था ; सलग तीन टी 20 सामन्यात पराभव , मालिका ही गमावली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । बांगलादेशच्या क्रिकेट संघानं नवा इतिहास घडवला आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत सलग तीन टी 20 सामने जिंकत मालिका खिशात घातली आहे. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. ढाका येथील शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवत बांगलादेशनं हा इतिहास नोंदवला आहे.

इतिहासात पहिल्यांदाच बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली आहे. याआधी बांगलादेशने आपल्या क्रिकेटच्या इतिहासात कधीही ऑस्ट्रेलियाला नमवत कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात मालिका जिंकलेली नव्हती.

सोबतच बांगलादेशने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग तीन टी 20 सामने जिंकले आहेत. बांगलादेश टीमनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात सलग तीन सामने जिंकण्याचा पराक्रम देखील केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *