ओला सीईओंनी शेअर केला व्हिडिओ ; ई-स्कूटरमध्ये रिव्हर्स गियर !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । ओला कंपनी १५ ऑगस्टला इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. यासाठी कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल मेहनत घेत आहेत. स्कूटरच्या निगडीत फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती ते सोशल मीडियावरून वारंवार देत आहेत. आता त्यांनी १७ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पहिली ६ सेकंद स्कूटर रिव्हर्स चालत असल्याचं दिसत आहे. ट्रॅफिक कोनच्या मधून स्कूटर रिव्हर्स जात आहे. विशेष म्हणजे राइडरचा चेहरा समोर आहे.

ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ‘!won em ot netsiL’ असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे नेटकरी बुचकळ्यात पडले आहेत. स्कूटरमध्ये रिव्हर्स गियर असल्याने त्यांनी तसे टेक्स्ट लिहीले आहेत. त्यांनी Listen to me now! असं उलट लिहिलं आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला रिव्हर्स गियर देण्यात आला असला तरी व्हिडिओ क्लिप रिव्हर्स करून अपलोड करण्यात आली आहे. स्कूटर पहिल्यांदा सरळ चालवली आहे. त्यानंतर एडिंटींग करून तिची दिशा रिव्हर्स करण्यात आली आहे.

ओला ई-स्कूटरचे फीचर्स

सिंगल चार्जवर १५० किलोमीटरपर्यंत धावू शकते.
टॉप स्पीड ९० किमी प्रति तास आहे.
१८ मिनिटात ५० टक्के चार्ज होते
स्कूटरमध्ये जास्त जागा असल्याने दोन हेल्मेट ठेवू शकतो
Gmail चे ‘हे’ ५ स्मार्ट छुपे फीचर्स तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

ओला ई-स्कूटर १० रंगासह बाजारात येणार आहे. यात काळा, पांढरा, ग्रे, पिवळा, लाल, निळा आणि त्याच्या शेड्सचा समावेश आहे. १५ जुलैपासून या स्कूटरची प्री बुकिंग सुरु झाली होती. ओला कंपनीने इलेक्ट्रीक स्कूटरसाठी ४०० शहराताील एक लाख ठिकाणी चार्जिंग पॉईंट्स देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहकांना चार्जिंग करताना अडचणी येणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *