महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । पुण्यात व्यापाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून आजच्या बैठकीमध्ये अजित पवार Ajit Pawar पुण्यातील Pune निर्बंध शिथिल करतात का आता याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राज्य सरकारने राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनाच्या Corona या निर्बंधांपासून शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, पुण्यात लेवल तीनचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने State Government घेतला आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गाने आक्रमक भूमिका घेतली होती.
पुण्यातील दुकाने सध्या ७ ते ४ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पुण्यातील व्यापाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आपली दुकाने संध्याकाळपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट Positivity rate कमी झाला असताना देखील निर्णय घेतला जात नाही जोपर्यंत काही निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरुच ठेऊ, अशी आक्रमक भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
सध्या पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ५ टक्क्यांच्या खाली आला आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्के असताना पुणे का सुरु झालं नाही हे कळत नाही असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी उपस्तिथ केला आहे. या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच बैठक पार पडली.
आज होणाऱ्या या बैठकीत पुण्यातील दुकाने संध्याकाळी ८ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुण्यातील व्यापारी वर्गाला दिलासा मिळू शकतो. कालच्या संदर्भात व्यापाऱ्यांनी दुकानांच्या चाव्या पोलीस आयुक्तांना देऊन आंदोलन केलं होतं. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेतात याकडे सर्व्यांचे लक्ष लागलेले आहे.