चार्जिंग:इलेक्ट्रिक गाड्यांसाठी युनिव्हर्सल चार्जिंग स्टेशन, सिलिंडरसारखी बॅटरी देऊन चार्ज बॅटरी घेता येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामधील सर्वात माेठी अडचण म्हणजे लांब पल्ल्याच्या प्रवासातील चार्जिंगची समस्या. ही अडचण दूर करण्यासाठी काही स्टार्टअपने माेठे यश मिळवले आहे. एका स्टार्टअपने युनिव्हर्सल चार्जिंग स्टेशनची संकल्पना आणली आहे. अशा ठिकाणी काेणत्याही कंपनीची गार्डी चार्ज केली जाऊ शकते. एक अन्य स्टार्टअप आधीपासूनच चार्ज बॅटरीची स्वॅप (अदला-बदली) करण्याचा पर्याय देत आहे. उत्तर भारताच्या प्रमुख राजमार्गांवरील ढाबे, हाॅटेल व रेस्तराँवर युनिव्हर्सल चार्जिंग स्टेशन तयार केले जात आहेत. स्टार्टअप ई-फिलचे संस्थापक, सीईआे मयंक जैन म्हणाले, प्रत्येक प्रकारच्या वाहनांची चार्जिंग करता येईल, असे चार्जिंग स्टेशन तयार करायचे हाेते. सध्या कारचे चार्जर सगळे ढाबे किंवा इतर ठिकाणी काम करत नाहीत. म्हणूनच आम्ही आपले साॅफ्टवेअर, हार्डवेअर, क्लाउंड व अॅप आधारित अशी प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली पूर्णपणे भारतीय आहे. प्रत्येक परिस्थितीत अनुकूल आहे. कंपनीने दाेन पेटंट देखील दाखल केले आहेत. ई-फिल कंपनीने मनाली, मसुरीसारख्या पर्यटनस्थळा व्यतिरिक्त दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशातील महामार्गावर ७० हून जास्त ठिकाणी युनिव्हर्सल चार्जर लावले आहेत. जैन म्हणाले, दाेन प्रमुख कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारने देशांतील विविध भागांचा दाैरा केला आहे. या प्रवासात आम्हाला अनेक प्रकारचा त्रास जाणवला. अशाच प्रकारे एक्सएक्ट टेक कंपनीने देशात फास्ट चार्जिंग सुविधा दिली आहे.

स्वॅपिंग स्टेशनही हाेताहेत
इलेक्ट्रिशिया नावाचा स्टार्टअप गॅस सिलिंडरच्या धर्तीवर रिकाम्या बॅटरीच्या बदल्यात चार्ज बॅटरी देत आहे. कंपनीचे संचालक सैफ उमर शाहिद म्हणाले, आम्ही स्वॅपिंग स्टेशन विकसित केले आहे. येथे रिफंडेबल सिक्युरिटी जमा करून काेणतीही बॅटरी घेता येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *