महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । येत्या 15 ऑगस्टपासून लोकल (Mumbai Local Train) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी केली. कोरोना लशीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करता येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (Maharashtra Navnirman Sena) स्वागत केलं आहे. यासंदर्भात मनसेनं खास ट्वीट (Tweet) केलं आहे.
मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी तसंच मुंबईचं अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ज्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी अत्यंत आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. आज जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल ही घोषणा केली. जनभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे.
#MumbaiLocals#मुंबईलोकल pic.twitter.com/k9IlIT1JS3
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 8, 2021
मनसेनं पत्राद्वारे केली होती मागणी
सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरु करावा, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राद्वारे त्यांनी सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली होती.