पुण्याचं टेन्शन वाढवतेय झिका, इतक्या गावांत संसर्गाची भिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । राज्यात कोरोनानंतर Corona आणखी एक संकट उभं राहिलं आहे. झिका Zika Virus व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्याने स्थानिक प्रशासन अलर्ट Alert झालं आहे. जिल्ह्यातील ७९ गावात झिका व्हायरसचा प्रार्दुभाव झाला असल्याची शंका जिल्हा प्रशासनाने व्यक्त केल्याने एकच खळबळ माजली आहे. आरोग्य विभागाने Health Department या गावात आपत्कालीन सुविधांसाठी तयारी करायला सुरुवात केली आहे.

बेलसरमध्ये Belsar काही दिवसांपूर्वी झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ४१ जणांचे नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या ४१ जणांपैकी २५ लोकांना चिकनगुनिया तर ३ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. तर बेलसर एका ५० वर्षाच्या महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचा निष्कर्ष दिला होता.

त्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झालं आणि तातडीने पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर सर्व ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाला अलर्ट करण्यात आले आहे. या ७९ गावांची यादी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तयार केली आहे.

या ७९ गावांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियासारखा आजार आढळला तर झिका व्हायरसच्या दृष्टीने ते संवेदनशील मानले जाणार आहेत. या गावांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजाराचे रुग्ण आढळले तर त्यांच्या रक्तांचे नमुने घेतले जाणार आहे आणि त्या रुग्णांची झिका संक्रमणाची चाचणी केली जाणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने तहसिलदार आणि आरोग्य विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, हा झिका व्हायरस एडीज मच्छरांमुळे पसरतो. हे मच्छर डेंग्यू आणि चिकनगुनिया या सारखे गंभीर आजार पसरवतात. झिका व्हायरसचे संक्रमण करण्यासाठी हे मच्छर जबाबदार आहेत. त्यामुळे या झिका व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *