PM मोदींकडून उज्ज्वला 2.0 योजना लाँच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट ।मोदी सउज्ज्वला 2.0 योजना लॉन्च :1 कोटी महिलांना मिळणार मोफत गॅस, address proof ची गरज नाहीरकारच्या (Modi Government) महत्त्वाकांक्षी उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं (Ujjwala 2.0) लॉन्चिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या (Video Conferencing) माध्यमातून करण्यात आलं. 2021-22 या आर्थिक वर्षात देशभरातील 1 कोटी महिलांना (1 crore women) या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं.

उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यातील 1 हजार महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि दिनेश शर्मादेखील उपस्थित होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे त्या राज्यातून या योजनेचा शुभारंभ करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या योजनेत सरकारकडून केवळ कनेक्शनच नव्हे, तर मोफत सिलिंडरदेखील दिले जाणार आहेत.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पत्त्याचा पुरावा देण्याची गरज नसल्याचं सरकारनं म्हटलं आहे. आपलं नाव आणि पत्ता एवढ्या तपशीलासह या गॅस योजनेसाठी महिलांना अर्ज करता येणार आहे. या योजनेत पात्र ठरण्यासाठीचे निकष सरकारनं निश्चित केले आहेत.

अर्जदार ही महिला असणं बंधनकारक आहे
महिलेचं वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावं
महिला दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असावी
महिलेकडं बीपीएल कार्ड किंवा रेशन कार्ड असणं बंधनकारक असेल
अर्जदार महिलेच्या कुटुंबातील इतर कुणाच्याही नावे एलपीजी कनेक्शन नसावे

असा करा अर्ज

या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल, pmuy.gov.in/ujjwala2.html या

वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे.

या वेबसाईटवर अर्ज डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल.
फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्यातील सर्व माहिती भरावी
हा फॉर्म एलपीजी गॅस केंद्रात जमा करावा
त्यासाठी आवश्यक कागदपत्रंही सोबत जमा करावीत
त्यानंतर कागदपत्रांची खातरजमा करून गॅस कनेक्शन मंजूर केलं जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *