महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दिमाखदार कामगिरीनंतरही भारताच्या विजयाला पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे लॉर्ड्सवर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी अधिक बळकट करण्यासाठी दुखापतग्रस्त शार्दुल ठाकूरच्या जागी कर्णधार विराट कोहली आपला सर्वोत्तम फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला संधी देण्याची दाट शक्यता आहे.त्या सोबत इशांत शर्मा चा देखील विचार केला जाऊ शकतो. के. एल. राहुलने दोन्ही डावांत अनुक्रमे ८४ आणि २६ धावा करताना सलामीच्या स्थानावरील दावेदारी भक्कम केली आहे. त्यामुळे दुखापतीतून सावरलेल्या मयांक अगरवालला संधी द्यायची झाल्यास भारत नेमकी कोणती रणनीती आखेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
इंग्लंड कडून अँडरसन , ब्रॉड जायबंदी झाल्याने साजिद मेहमूद , मार्कवूड ला संधी मिळण्याची शक्यता तर फलंदाजी बळकट करण्यासाठी हमीद चा समावेश होऊ शकतो . अष्टपैलु मोईन अली देखील अंतिम ११ मध्ये असेल .
लंडनमध्ये कमाल तापमान २४ अंश सेल्सियस नोंदले गेले आहे, तर सरासरी तापमान १४ अंश सेल्सियस आहे. या परिस्थितीत इंग्लंडकडून हिरवीगार खेळपट्टी ठेवली जाण्याची शक्यता कमी आहे. २०१८मध्ये अशाच प्रकारच्या खेळपट्टीवर भारताची फलंदाजी दोन दिवसांत दोनदा कोसळली होती. अष्टपैलू ख्रिस वोक्सने इंग्लंडच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, मयांक अगरवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी,आर. अश्विन, अक्षर पटेल,
इंग्लंड : जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मोईन अली, रॉरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रॉवली, सॅम करन, हसीब हमीद, ऑली रॉबिन्सन, मार्क वूड, साकिब महमूद.जेम्स अँडरसन,डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, डोम सिब्ली,
* वेळ : दुपारी ३.३० वा.
* थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३ (हिंदी)