![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । गुड रिटर्न्स वेबसाइटच्या एका अहवालानुसार, सोन्याच्या किंमतीत आलेली घसरण खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे आणि गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे होल्ड करण्याची संधी मिळते आहे. भारतात आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र दर स्थिर आहेत. रॉयटर्सच्या अहवालानुसार, सोन्याचे दर 1,750.34 डॉलर प्रति औंस आहेत. तर अमेरिकेत सोन्याची वायदे किंमत 1,753.40 डॉलरवर आहे.
काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?
तज्ज्ञांच्या मते, दीर्घ कालावधीसाठी सोन्याबाबत दृष्टीकोन पॉझिटिव्ह आहे आणि किंमती कमी झाल्यावर यामध्ये खरेदी केली पाहिजे. दरम्यान काही कारणांमुळे सोन्यात तेजी येऊ शकते. अमेरिका आणि चीनमधल्या वाढत्या कोरोना संक्रमणामुळे ग्लोबल इकॉनॉमीच्या रिकव्हरीबाबत चिंता आहे. अनेक देशात इक्विटी इंडेक्स रेकॉर्ड हाय लेव्हलच्या जवळपास आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल वाढू शकतो. महागाईविरोधात हेजिंगसाठी देखील सोन्याची खरेदी होऊ शकते.
महत्त्वाच्या शहरातील सोन्याचे भाव
>> चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 43,720 रुपये प्रति तोळा आहे
>> मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 45,280 रुपये प्रति तोळा आहे
>> दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 45,500 रुपये प्रति तोळा आहे
>> कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 45,700 रुपये प्रति तोळा आहे
>>बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 43,350 रुपये प्रति तोळा आहे
>> पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 44,440 रुपये प्रति तोळा आहे