ITR फाईल करण्याचे फायदे ; पहा इन्कम टॅक्स रिटर्न भरणं का आहे फायदेशीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । आयटीआर फाईल झाल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र (ITR Certificate) दिलं जातं. हे प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला असतो. या प्रमाणपत्रामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी फायदा होतो. एखाद्या सरकारी किंवा खासगी बँकेकडून कर्ज (ITR benefit for loan) घेताना ते इन्कम प्रूफ (Income proof) मागतात. यावेळी हे आयटीआर सर्टिफिकेट देणं गरजेचं असतं. कमीत कमी गेल्या तीन वर्षांचे आयटीआर सर्टिफिकेट्स या ठिकाणी दाखवावे लागतात. हे नसेल, तर बँका सहसा कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. नियमितपणे आयटीआर भरत असाल, तर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. यासोबतच, सरकारी विभागातून एखादं कंत्राट (ITR for business) मिळवण्यासाठी, तसेच जास्तीत जास्त इन्शुरन्स कव्हर (ITR for insurance cover) मिळण्यासाठीही आयटीआर सर्टिफिकेट फायद्याचं ठरतं. झी बिझने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

बऱ्याच जणांना हे माहिती नसेल, पण परदेशवारी करण्यासाठीही आयटीआर गरजेचं आहे. दुसऱ्या देशाच्या व्हिसासाठी (ITR must for visa) अर्ज करताना तुम्हाला आयटीआर मागितला जातो. आपल्या देशात येत असणाऱ्या व्यक्तीची आर्थिक स्थिती कशी आहे, हे तपासण्यासाठी व्हिसा ॲथॉरिटी तीन ते पाच वर्षांपर्यंतचे आयटीआर सर्टिफिकेट्स मागू शकतात. यासोबतच, तुम्ही जर आयटीआर अर्ज मॅन्युअली भरला असेल, तर त्याची पावती तुमच्या पत्त्यावर पाठवली जाते. याचा वापर तुम्ही अड्रेस प्रूफ (ITR as address proof) म्हणूनही करू शकता.

कित्येक लोकांचा पगार एवढा असतो, की त्यावर कोणताही कर लागू होत नाही. पण तरीही काही कारणांनी त्यातून टीडीएस (TDS Tax Deducted at Source) कापला जातो. अशा परिस्थितीत हा टीडीएस तुम्ही आयटीआर भरुन परत मिळवू (ITR for TDS) शकता. यासोबतच, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आयटीआर हा चांगला रिसोर्स आहे. आपल्याला तोटा होणार असल्याचे जाणवल्यास, वेळीच आयटीआर भरुन तुम्ही तो तोटा पुढील वर्षी कॅरीफॉरवर्ड (ITR use in share market) करू शकता. पुढील वर्षी नफा झाल्यानंतर तुम्ही मागील वर्षीचा तोटा त्यात ॲडजेस्ट करु शकाल, ज्यामुळे तुम्हाला करात सूट मिळेल. 2020-21 या वर्षासाठी आयटीआर फाईल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत (ITR last date) मुदत देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *