मुख्यमंत्र्याना अटक करणाऱ्या IPS अधिकारी, नाव ऐकल्यावर गुन्हेगार ही थरथर कापतात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । कर्नाटकच्या आयपीएस अधिकारी (IPS Officer) डी रूपा मोदगिल (IPS D Roopa Moudgil) नेहमीच त्यांच्या कामाबद्दल चर्चेत असतात. कर्नाटक केडरच्या 2000 बॅचच्या आयपीएस अधिकारी डी रूपा (D Roopa) या जेलमधील एआयडीएमकेच्या (AIDMK) नेत्या शशिकला यांच्या व्हीआयपी उपचारांच्या खुलाशापासून ते तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांच्या अटकेपर्यंत प्रत्येक गोष्टीत सहभागी आहेत.

डी रूपा (D Roopa) कर्नाटक केडरच्या 2000 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी होमगार्डमध्ये अतिरिक्त अधिकारी आणि नागरी संरक्षणमध्ये अतिरिक्त कमांडंट म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी वाहतूक आणि रस्ता सुरक्षा विभागात आयुक्त आणि कर्नाटक कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक पदही भूषवले आहे. डी रूपा या देशातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत. त्यांना 2013 मध्ये पोलीस विभागात सायबर क्राईमची कमांड देण्यात आली होती. डी रूपा एक कडक पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे नाव घेतल्यानंतर अनेक गुंड तसेच गुन्हेगार थरथर कापतात.

डी रूपा (D Roopa) यांचा जन्म कर्नाटकातील देवनागेरे येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण येथूनच केले. त्यांचे वडील जे.एस. दिवाकर हे अभियंता होते, जे आता निवृत्त झाले आहेत. डी रूपा ने कुवेम्पू विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आणि सुवर्णपदक जिंकले. यानंतर त्यांनी बंगलोर विद्यापीठातून मानसशास्त्रात एम.ए. केले. एमएनंतर त्यांनी नेट-जेआरएफ परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचा ध्यास घेतला.

डी रुपा (D Roopa) यांनी वयाच्या 24 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि अखिल भारतात 43 वा रँक मिळवला. यानंतर त्यांना आयएएस बनण्याची संधी मिळाली, पण त्यांनी पोलीस सेवेची निवड केली, कारण आयपीएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *