महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑगस्ट । सोन्याचे भाव दररोज कमी जास्त होताना दिसतात. यामागे वेगवेगळी कारणं असतात. गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सोनाच्या आणि चांदीच्या भावामध्ये उच्चांक आणि नीचांक दोन्ही बघायला मिळाले. या महिन्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीचे भाव कमी झाले आहेत. ज्यांना सोन्या-चांदीचे दागिने बनवायचे आहेत त्यांच्यासाठी हीच योग्य वेळ आहे असही म्हंटलं जात आहे.
मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता येथे आज सोन्याचे दर वाढले आहेत. दरानुसार, दिल्लीमध्ये २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचे दर रु. ४५,७६० आणि १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत रु. ४९,९२० आहे. मुंबईत २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचे दर रु. ४५,५५० आणि रु. २४ कॅरेटच्या ४६,५५० प्रति १० ग्रॅम रु. २७० एवढी वाढले आहे. दरम्यान, मुंबई, कोलकाता, दिल्ली येथे चांदीचे दर ६२,५०० रुपये आहे.
येथे नमूद केलेले सोने आणि चांदीचे दर सकाळी ८ वाजताचे आहेत. या किंमतीमध्ये दररोज चढ -उतार सुरू असतो. सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याच्या दरात चढ -उतार होण्याची अनेक कारणे आहेत, जसे की आंतरराष्ट्रीय बाजारातील चलन किंमतींमध्ये बदल, महागाई, मध्यवर्ती बँकांमध्ये सोन्याचा साठा, त्यांचे व्याजदर, दागिने बाजार, भौगोलिक तणाव, व्यापार युद्ध आणि इतर अनेक घटकांमुळे सोन्याच्या दरावर परिणाम होतो असे म्हटले जाते. फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचे संकेत दिल्याने सोन्याचे दर कमी होत आहेत.