महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑगस्ट । पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 12 लाख 3 हजार 660 जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व खासगी केंद्रांच्या माध्यमातून शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. लसीकरणाचा बारा लाखांचा टप्पा नुकताच पूर्ण झाला.
आजपर्यंत 12 लाख 3 हजार 660 जणांनी लस घेतली आहे. यामध्ये 8 लाख 88 हजार 555 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 3 लाख 15 हजार 105 नागरिकांचा दुसराही डोस झाला आहे. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचे सरासरी प्रमाण 30 टक्के इतके आहे.