महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑगस्ट । देशभर आज 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह ओसांडून वाहतोय. त्यानिमित्ताने सर्वत्र धामधूम सुरु आहे.आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक पद्धतीने तिरंगी फुलांची सजावट करीत तिरंग्याला अनोखी सलामी दिली आहे .
पुणे येथील मोरया प्रतिष्ठानने ही गुळाची सेवा विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवानिमित्त विठ्ठल मंदिरात दरवर्षी वेगळेपण जपले जाते. ही फुलांची सजावट करताना ऑर्किड, करनिशन, कामिनी, शेवंती या फुलांचा वापर करण्यात आला आहे.विठ्ठल मंदिरातील सोलाखांबी, चौखांबी, गाभारा आणि रुक्मिणी गाभाऱ्यात ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे.विठुराय आणि रुक्मिणी मातेच्या गळ्यातही तिरंगी पट्टीची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी स्वातंत्र्यदिनाच्या या वैशिष्ट्यपूर्ण सजावटीमुळे मंदिरात तिरंगी उत्सव खुलून दिसत आहे.