केस गळती ; या घटकांचा करा आहारात समावेश ;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । केस गळणं (Hair Fall) ही आता सर्वसामान्य समस्या झाली आहे. हल्ली कमी वयातच केसांच्या समस्या (Hair Problem) व्हायला लागल्या आहेत. त्यासाठी उपाय केले तरी ते तात्पूरते ठरतात. त्यामुळे केस गळती (Hair Loss) थांबली तरी पुन्हा व्हायला लागते. केस गळल्यामुळे पातळ होऊन टक्कल दिसेपर्यंत वाट पाहण्यापेक्षा वेळीच उपाय करायला हवेत.

खूपवेळा आपण पोट भरणारा आहार (Diet) घेतो. पण, त्यामुळे किती पोषण (Nutrition) मिळतं याचा विचारही करत नाहीत. खरंतर, आपण जे खातो त्यामधून आपल्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत आणि शरीरातल्या अवयवांनाही पोषण मिळतं. पण, वयानुसार शरीरही कमजोर होतं आणि आरोग्य विषयक समस्यांबरोबर (Health Issue) त्वचा आणि केसांच्याही समस्या व्हायला लागतात. केस आणि त्वचा अगदी म्हातारपणातही चांगले ठेवायचे असतील तर, आहाराकडे लक्ष द्या आणि काही प्रोटीनयुक्त सप्लीमेंट (Protein Supplement) घ्यायला सुरुवात करा.

बायोटीन
आपल्या रोजच्या आहारात बायोटीन असायला हवं. यामुळे आपले केस गळणं कमी होतं. केसांची व्यवस्थित काळजी घेऊनही केस गळत असतील तर, त्यांना योग्य पोषणाची आवश्यकता असते. अशा वेळेस बायोटीन टेबलेट्स किंवा कॅप्सूल आपल्या आहारामध्ये समाविष्ट करा. प्रोटीन, कार्बोहाइड्रेट आणि फॅट पचायला बायोटिन मदत करतं. यामुळे खाल्लेल्या पदार्थांपासून शरीराला पोषण मिळून केस गळणं कमी होतं. केळं, ब्रोकोली, रताळं, मशरूम, ड्रायफ्रूट आणि अंड्याचा पिवळा बलक यामधून बायोटीन मिळू शकतो.

झिंक
झिंक देखील आपल्या शरीराच्या संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक असतं. झिंकमुळे आपले केस घनदाट आणि लांब होतात. याशिवाय नवीन केस उगवायलाही मदत होते. त्यामुळेच केस वाढीसाठी आणि टिकून राहण्यासाठी झिंकचा आहारामध्ये समावेश करा.

झिंकयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. शिवाय केस लांब सडक होतात. यासाठी सप्लीमेंटचाही वापर करता येऊ शकतो. कडधान्य, बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू यासारखे ड्रायफ्रूट, दूध, अंड, मटण यामधून झिंक मिळतं.

व्हिटॅमिन बी 12

शाकाहारी लोकांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी 12ची कमतरता निर्माण होते. आपल्या केसांसाठी व्हिटॅमिन बी 12 अत्यंत आवश्यक आहे. शाकाहार करणाऱ्या लोकांनी व्हिटॅमिन बी 12 सप्लिमेंट घ्यायला हव्यात. व्हिटॅमिन बी 12 ऍनिमल प्रॉडक्टमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे मांसाहारी पदार्थ खावेत किंवा शाकाहारी लोकांनी सप्लीमेंटचा वापर करावा.

व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डी हाडं मजबूत करतं. याशिवाय स्किन आणि केसांसाठीही आवश्यक असतं. महिलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते. भारतामध्ये अनिमिया आणि व्हिटॅमिन डीची कमतरता महिलांमध्ये दिसून येते.

शरीरात व्हिटॅमिन डी कमी असेल तर, थकवा जाणवतो. झोप जास्त येते आणि उदास वाटायला लागतं. याशिवाय केस गळायला लागतात. सूर्यापासून व्हिटॅमिन डी मिळतं मात्र, व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर, ती कॅप्सूल वापरून पूर्ण करावी लागते.

अमिनो अ‍ॅसिड
शरीरासाठी अमिनो अ‍ॅसिड महत्त्वाचं असलं तरी, याचं उत्पादन शरीरात होऊ शकत नाही. त्यामुळे त्याची कमतरताही लवकर निर्माण होते. केसांना चांगलं पोषण मिळण्यासाठी आणि अमिनो अ‍ॅसिड आवश्यक असतं.

कोलाजेन प्रमाणे अमिनो अ‍ॅसिड शरीरात तयार होत नाही. त्यामुळे याच्या सप्लीमेंट घेऊ शकता किंवा आहारामध्ये शेंगदाणे, छोले, चणे, हिरव्या शेंगा, सोयाबीन, राजमा अशा पदार्थांचा समावेश करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *