INDvsENG 2nd Test: लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय; मालिकेत आघाडी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । भारतीय Indian संघाने लॉर्ड्सवर १९ कसोटी सामने खेळले आहे. मात्र, केवळ ३ मध्ये भारतीय संघाने जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा ऐतिहासिक ठिकाणी विजयी कामगिरी केली आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वातवाने भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. लॉर्ड्स या ठिकाणी झालेल्या पहिल्या कसोटी मध्ये भारतीय संघाने दिमाखात विजय मिळविला आहे.

इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत असताना, २९४ धावांची मजल मारलेली आहे. ग्रॅहम गूचने ११४ धावांची खेळी यावेळी साकारली आहे. डेरेक प्रिंगलने ६३ धावा करत त्याला उत्तमप्रकारची साथ दिली आहे. भारताकडून चेतन शर्मा यांनी ५ विकेट्स घेतले आहे. दिलीप वेंगसरकर यांच्या शतकाच्या जोरावर भारताने ३४१ धावा करत लहान पण महत्त्वपूर्ण आघाडी ठरवलेली आहे. वेंगसरकर यांनी १२६ धावांची दिमाखदार खेळ रंगवला होता.

मोहिंदर अमरनाथ यांनी ६९ धावा करत, त्याला उत्तमप्रकारे साथ दिली आहे. इंग्लंडतर्फे ग्रॅहम डिलीने ४ तर डेरेक प्रिंगलने ३ विकेट्स घेतले आहे. भारतीय संघाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडने दुसऱ्या डावात गुडघे टेकवले आहे. त्यांचा २ डाव हा १८० धावातच आटोपलेला आहे. कपिल देवने ४ तर मणिंदर सिंगने ३ विकेट्स यावेळी घेतले आहे. भारतीय संघाला विजयाकरिता १३४ धावांचे लक्ष्य मिळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *