महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । पुण्यात रस्ते आणि पदपथांवर गणेशमूर्ती आणि अन्य साहित्य विक्रीचे स्टॉल उभे करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय महापालिके ने घेतला आहे. महापालिके च्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. महापालिके च्या मालकीच्या मोकळ्या जागांमध्ये गणेशमूर्ती विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याबाबतची सूचना मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाला करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त, मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त, सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त यांना त्याबाबत अतिक्रमण विभागाने लेखी पत्र दिले आहे.
येत्या १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची बैठक गेल्या आठवडय़ात घेण्यात आली होती. त्यामध्ये गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबरोबरच गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करणे आणि पदपथ आणि रस्त्यांवर स्टॉल्स लावण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने त्याबाबतचे लेखी आदेश काढले आहेत.
रस्ता, पदपथांवर उत्सव कालवाधीपूर्वी तसेच उत्सवाच्या कालावधीत गणेश मूर्ती विक्री, साहित्य विक्री तसेच खाद्यपदार्थ विक्रीचे अनधिकृत स्टॉल्स उभारले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पथारी, हातगाडी व्यावसायिकांची अतिक्रमणे होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात, अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत, पदपथ, रस्त्यांवरून पादचाऱ्यांना विना अडथळा मार्गक्रमण करता यावे, यासाठी पूर्वनियोजन करावे आणि उपाययोजनांच्या कार्यवाहीचा अहवाल दररोज महापालिका आयुक्त कार्यालयाला सादर करावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यालयाने त्यांच्या हद्दीतील महापालिके च्या मोकळ्या जागा किं वा शाळांची पटांगणे योग्य त्या सुविधांसह विक्रे त्यांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही करण्यात आली आहे.