महाराष्ट्र २४- व्यापारी संबंधांच्या विषयात भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिलेली नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नियोजित भारत दौऱ्याआधी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
‘भारताकडून आम्हाला चांगली वागणूक मिळालेले नाही’ असे ट्रम्प अँड्रूयूज येथील तळावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ट्रम्प यांनी भारतावर टीका केली असली तरी, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. भारत दौऱ्यावर जाण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘मला पंतप्रधान नरेंद्र मोदी भरपूर आवडतात’ असे ट्रम्प म्हणाले.
येत्या २४ फेब्रुवारीला ट्रम्प दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. “एअरपोर्टपासून रोड शो आणि स्टेडियमवरील कार्यक्रमात ७० लाख लोक सहभागी होणार असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. जगातील हे सर्वात मोठे स्टेडियम असल्याचे मला सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी भरपूर उत्साहित आहे. तुम्हा सर्वांनाही आनंद मिळेल” असे ट्रम्प म्हणाले.
कुक्कुटपालन, डेअरी उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत जास्तीत जास्त प्रवेश मिळावा तसेच अन्य उत्पादनांवरील टॅक्स कमी व्हावा यासंबंधी ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात करार व्हावा यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. पण अजूनही यामध्ये यश मिळालेले नाही.