सप्टेंबरनंतर लहान मुलांनाही मिळणार लस, ICMR-NIVच्या संचालकांचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आलाय. मात्र या लाटेपूर्वीच एक चांगली बातमी समोर आली आहे. लवकरच देशात लहान मुलांचं लसीकरण सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानुसार, सप्टेंबर महिन्यात किंवा त्यांनंतर लगेच लहान मुलांचं लसीकरण सुरु होऊ शकतं.

ICMR-NIVच्या संचालिका प्रिया अब्राहम यांनी लहान मुलांचं लसीकरण सुरु करण्याबाबत संकेत दिलेत. लहान मुलांवर लसीच्या चाचण्या झाल्या असून चाचण्यांचे रिझल्ट समोर येतील. त्यानंतर ते DCGIकडे याचा डेटा पाठवण्यात येईल आणि मुलांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेतला जाईल, असं प्रिया अब्राहम म्हणाल्या आहेत.

दुसरीकडे भारतातही लशीचा तिसरा डोस घ्यावा लागू शकतो. काही देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस दिला जातोय. भारतातही अशा शिफारसी येऊ लागल्याचं, प्रिया अब्राहम यांनी स्पष्ट केलंय. भविष्यात बुस्टर डोसची गरज भासू शकते. त्याचप्रमाणे मिक्स अँड मॅच लसी सुरक्षित असल्याचंही अब्राहम यांचं म्हणणं आहे. सीरमचे संचालक सायरस पुनावाला यांनीही पुण्यातील कार्यक्रमत बुस्टर डोसची गरज असल्याचं म्हटलं होतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *