Fixed Deposit: बँक की Post Office कुठे मिळेल एफडीवर सर्वाधिक व्याज?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । कोरोना काळात (Coronavirus) बचत आणि गुंतवणुकीसाठी अनेक पर्यायांचा विचार केला जातो. मात्र अनेक नवनवे पर्याय उपलब्ध होऊनही फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) च्या पर्यायाकडे अद्यापही एक सुरक्षित पर्याय म्हणून पाहिले जाते. एफडी हा एक सुरक्षित आणि जोखीम नसणारा गुंतवणुकीचा पर्याय आहे. तुम्ही देखील एफडीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही बँक, पोस्ट ऑफिस आणि नॉन बँकिंग वित्तिय संस्थांमध्ये गुंतवणूक करू शकता.

एफडीमध्ये चांगला रिटर्न मिळवायचा असेल तर बजाज फायनान्स एक चांगला पर्याय आहे. याठिकाणी चांगल्या व्याजदराने तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करता येई. चांगल्या व्याजदराशिवाय आणखीही काही सुविधा तुम्हाला मिळतील. तुम्ही लाँग टर्मसाठी गुंतवणूक करणार असाल तर हा पर्याय ठरू शकतो.

व्याजाच्या बाबतीत पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या तुलनेत बजाज फायनान्स एफडीवर (FD) ग्राहकांना अधिक व्याज देत आहे. सध्या बजाज फायनान्समध्ये 1 ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी असणाऱ्या एफडीवर 5.65 ते 6.60 टक्के दराने व्याज मिळते आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 5.90 ते 6.75 टक्के आहे.

दरम्यान बँकांमध्ये 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर साधारण 5.30 टक्के ते 6.50 टक्के या दरम्यान व्याजदर मिळतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 5.80 ते 6.50 टक्के इतका आहे.

यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही एफडी काढणार असाल तर तुम्हाला 7 दिवस ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी असणाऱ्या एफडीवर 5.50 ते 6.70 टक्के दराने व्याज मिळते आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कालावधी 5.50 ते 6.70 टक्के आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *