महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । मी प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकंही वाचली आहे आणि यशवंतराव चव्हाण यांची पुस्तकं सुद्धा वाचली आहे. मी जे काही बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांचा काय संबंध होता हे शरद पवार (sharad pawar) यांनी समजून सांगावे’, असा सवाल उपस्थितीत करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) जोरदार पलटवार केला आहे.पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना राज ठाकरे यांनी आपल्या विधानावरून झालेल्या वादावर आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रवादीवर राज ठाकरे यांनी निशाणा साधला.
मी एका कार्यक्रमात तसं विधान केलं होतं. पण, माझ्या विधानाचा आणि माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विधानाचा काय संबंध होता. ‘मी प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकंही वाचली आहे आणि यशवंतराव चव्हाण यांची पुस्तकं सुद्धा वाचली आहे. मी जे काही बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांचा काय संबंध होता हे शरद पवार यांनी समजून सांगावे’ असा पलटवार राज ठाकरे यांनी केला.
शरद पवार यांचा वाढदिवस होता, त्यावेळी मी भाषण केलं होतं. आजचा दिवस पाहता हे राखून ठेवलं पाहिजे, असं मी बोललो होतो. कुणी वाढदिवसाच्या दिवशी असं कुणी बोलत नाही. म्हणून माझा पाठिंबा होता असं काही नव्हतं. राष्ट्रवादीचे नेते भाषणाचा शेवट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उल्लेख करून करता आणि सुरुवात शाहू फुले यांचा उल्लेख करून करतात. मुळात शिवरायांच्या भाषणापासून सुरुवात झाली पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.
राज्यात जातीपातीचं राजकारण प्रचंड वाढलं आहे. यातून महाराष्ट्र बाहेर आला पाहिजे. राष्ट्रवादीच्या जन्मापासून जातीचं राजकारण होत आलं आहे, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.
‘मी बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहास संशोधक म्हणून भेटलो होतो, ते ब्राम्हण आहे, म्हणून भेटायला गेलो नव्हतो. त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला असं सांगताय, पण नेमकं काय चुकीचं लिहिलं ते तरी सांगा. त्यांनी पहिलं पुस्तक हे 50 वर्षांपूर्वी लिहिलं होतं, मग त्यावेळी चुकीचं जाणवलं नाही का? नेमकं आताच वाद कशाला उकरून काढायचा. मुळात यांना तरुणांची डोकी फिरवण्यासाठी आहे. मुद्दामवरून हे सर्व सुरू आहे. हे सगळं ठरवून चाललं आहे, असा टोलाही राज ठाकरेंनी केला.
माझ्या आजोबांच्या पुस्तकात ज्या काळात घडले त्यावर सर्व लिहिलेलं होतं. ते काय बोललं नेमकं आपल्या सोईनुसार घ्यायचं आणि बाकीचं ठेवून द्यायचं. मी यशवंत चव्हाण सुद्धा वाचले आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
लॉकडाऊन लागण्याच्या आधी मी सांगितलं होतं, पक्ष स्थापनेआधी हा झेंडा माझ्या डोक्यात होता. त्यानंतर मेळावा घेऊन झेंडा मी समोर आणला. हे माझ्या डोक्यात होतं ते मी केलं. त्यामुळे झेंडा आणि हिंदुत्व असं काही विषय नव्हता. एक गोष्ट लक्षात ठेवावं, मी एका कडवड हिंदूत्त्व घराण्यात जन्माला आलो आहे, माझ्यावर तेच संस्कार आहे, असंही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.