पुणे ; बांधकाम व्यवसायिकाकडे ३० कोटी खंडणीची मागणी ; FIR दाखल.

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । पुणे ; हेमंत मोटाडू यांनी सर्वे नं ११८ च-होली बुद्रुक येथे ५ हेक्टर ३५ आर व्ही जमीन २० मार्च २०१३ रोजी १ कोटी ३६ लाख मोबदला देवून श्री हिरानंदाणी प्रॉपर्टी प्रा.लि. मुंबई यांच्याकडून रितसर रजिस्टर्ड खरेदी खत करून घेतली. त्यानंतर त्यांना माहीत पडले की ही जमीन अली जाफरी यांनी हिरानंदाणीला २००५ मध्ये हस्तांतर केली होती. संपूर्ण मोबदला घेवून अली जाफरी यांनी एकदा विकलेली जमीन पुन्हा त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी बाई वेनिसा डिसूजा यांना बोटी व लबाडी करून १८/१०/२०१२ रोजी खरेदी खत करून दिली. त्यानंतर २०/१२/२०२० रोजी अली जाफरी यांनी मला कोहिनूर हॉटेल एमजी रोड येथे बोलावून मला ३० कोट रुपये दे मग मी तुला या जमिनीची एनओसी देतो अन्यथा मी तुझे नुकसान करीन अशी धमकी दिली. म्हणून हेमंत मोटाडू यांनी अली जाफरी राहणार ८ नेपियन रोड, पुणे कॅम्प व वेनिसा डिसूजा राहणार २०६ अकबर रेडियंट प्लाझा ३२७ महात्मा गांधी रोड यांच्या विरुद्ध सीआयडी ऑफिस संगम पूल येथे खंडणी विभागात एफआयआर दाखल केली आहे.

Ali Jaffrey FIR 18-08-21

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *