IND vs ENG: दिग्गज बॉलर करणार इंग्लंडची शिकार, विराट कोहलीनं (Virat Kohli) दिले टीममध्ये बदलाचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टेस्टला (India vs England Third Test) आजपासून (बुधवार) हेडिंग्लेमध्ये सुरुवात होत आहे. टीम इंडियानं लॉर्ड्स टेस्ट जिंकून या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता हेडिंग्ले टेस्ट जिंकून ही आघाडी 2-0 करण्याचा टीमचा प्रयत्न असेल. या टेस्टच्या आदल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) टीममध्ये बदलाचे संकेत दिले आहेत.

विराट कोहलीनं पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘हेडिंग्लेचं पिच पाहून आम्ही आश्चर्यचकित आहोत. या पिचवर गवत असेल असा आमचा अंदाज होता. पण, इथं गवत अजिबात नाही. आम्ही आधी 12 खेळाडूंची निवड करु, त्यानंतर पिचची परिस्थिती पाहून बुधवारी अंतिम 11 जणांची घोषणा करु. सध्या तरी सर्व काही शक्य आहे.’ विराटचं हे वक्तव्य म्हणजे टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर आर. अश्विनचे टीममधील पुनरागमनाचे संकेत असल्याचं मानलं जात आहे.

या टीममधील सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या अश्विननं इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये एकही टेस्ट मॅच खेळलेली नाही. पहिल्या दोन टेस्टमध्ये टीम इंडियानं एकमेव स्पिनर म्हणून रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची टीममध्ये निवड केली होती. जडेजानं बॅटींग समाधानकारक केली असली तरी बॉलर म्हणून त्यानं निराशा केली आहे. या सीरिजमध्ये अजून एकही विकेट त्याला मिळलेली नाही. त्यामुळे जडेजाच्या जागी अश्विनचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट (India vs England 3rd Test) हेडिंग्लेमध्ये होणार आहे. या मैदानात भारतीय टीम गेल्या 54 वर्षात भारतानं एकही टेस्ट हरलेली नाही. भारतीय टीमनं इथं आजवर 6 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यामध्ये 2 सामन्यात विजय मिळवला असून 3 मध्ये पराभव झाला आहे. पण हेडिंग्लेमधील मागील दोन्ही टेस्ट टीम इंडियानं जिंकल्या आहेत. या मैदानावर भारतीय टीमचा शेवटचा पराभव 1967 साली झाला होता. 1986 साली झालेल्या टेस्टमध्ये भारतानं इंग्लंडचा 279 रननं पराभव केला होता. त्यानंतर 2002 साली टीम इंडियानं हेडिंग्ले टेस्ट 1 इनिंग आणि 46 रननं जिंकली होती.

भारताची संभाव्य 11 : केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, इशांत शर्मा/रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *