‘आता आपण करोनाच्या “कानात”आत्मविश्वासाने सांगू शकतो तू संपलास’ – संदीप देशपांडें

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेलं ते आक्षेपार्ह वक्तव्य, शिवसेनेने (shivsena) राज्यभरात नारायण राणेंविरोधात केलेलं हिंसक आंदोलन (protest) त्यानंतर नारायण राणेंना रात्री झालेली अटक आणि सुटका या संपूर्ण घटनाक्रमावर महाराष्ट्र नविर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (mns sandeep deshpande) यांनी उपरोधिक टि्वट केलं आहे. कालच्या भानगडी मुळे महाराष्ट्राला झालेले फायदे त्यांनी सांगितले आहेत.

काल शिवसेनेने केलेल्या आंदोलनात कोरोना नियम पायदळी तुडवल्याचे दिसले. त्याच मुद्यावरुन आजही संदीप देशपांडेंनी सत्ताधारी शिवसेना आणि पत्रकारांवर निशाणा साधला आहे. ‘आता आपण करोनाच्या “कानात”आत्मविश्वासाने सांगू शकतो तू संपलास’ असे संदीप देशपांडेंनी म्हटले आहे. सध्या कोरोना काळ सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वसामान्य जनतेला कोरोना प्रादुर्भाव आणि तिसरी लाट रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्यास सांगत आहेत.

“आज सकाळ पासून महाराष्ट्रा मध्ये आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही गर्दी च गर्दी अस असून “करोना हृदय सम्राट”गप्प का?आणि हो सोशल डिस्टनसिंग चा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत” असे टि्वट काल देशपांडेंनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *