महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । केंद्रीय मंत्री रस्त्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी बुधवारी ऑटोमोबाईल कंपन्यांना डिझेल इंजिनच्या गाड्या बनवणे कमी करण्याच्या प्रयत्नासोबतच दुसऱ्या टेक्नॉलॉजीच्या गाड्यांना प्रोत्साहन देण्याचे सांगितले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार गडकरी यांनी ऑटो इंडस्ट्रीच्या SIAM च्या वार्षिक कॉफ्रंसला वर्च्युअली संबोधित केले.
गडकरी यांनी ऑटोमोबाईल कंपन्याना डीझेल इंजिनच्या वाहने कमी करण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. डीझेलमुळे होणारे प्रदुषण पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. पर्यायी टेक्नॉलॉजीचा वापरासाठी संशोधन करायला हवे. इंडस्ट्रीकडून आशा करतो की, ई 20 च्या अंतर्गत वाहनांना गतीने तयार करण्यात येईल. ई20 वाहने म्हणजेच इंधनात 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोलचे मिश्रण होय.
गडकरी यांनी म्हटले की, यामुळे आयात बिलांमध्ये कपात होईल, पर्यायवरणाचीही सुरक्षा होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. त्यांनी पुढे म्हटले की, भारताच्या जीडीपीमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राची हिस्सेदार 7.1 टक्क्यांनी वाढून 12 टक्क्यांवर पोहचायला हवी. देशाला 5 ट्रिलियन इकोनॉमी बनवण्यासाठी ऑटोमोबाईल सेक्टरची महत्वपूर्ण भूमिका आहे.