केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; असंघटित क्षेत्रातील मजुरांना अडीअडचणीच्या काळात मिळणार हक्काची मदत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । देशभरातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांच्यादृष्टीने मोदी सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टल लाँच केले होते. त्याआधारे असंघटित क्षेत्रातील मजुरांना ई-श्रम कार्ड मिळेल. या कार्डवर मजुरांना पाच लाखांचा मोफत आरोग्य विमा उपलब्ध झाला आहे.

असंघटित क्षेत्रातील मजुरांना ई-श्रम पोर्टलवर स्वत: नोंदणी करावी लागणार आहे. त्यांचे नाव, पत्ता, व्यवसाय, शिक्षण, कौशल्य आणि कौटुंबिक माहिती असा सर्व तपशील द्यावा लागेल. नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन मजूर स्वत:चे ई-श्रम कार्ड तयार करुन घेऊ शकतात.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी देशभरात एक टोल फ्री नंबरही असेल. यावर फोन करुन मजूर आपली नोंदणी करुन घेऊ शकतात. या पोर्टलवर असंघटित मजुरांची नोंदणी झाल्यास केंद्र सरकारला त्यांची नेमकी संख्या आणि कामाचे स्वरुप याचा माग काढण्यात मदत मिळेल.

मोदी सरकाच्या काळात असंघटित क्षेत्रातील मजुरांसाठी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनाही (PM Shram Yogi Man Dhan Yojna) सुरु करण्यात आली होती. त्यामुळे रिक्षाचालक, बांधकाम मजूर, रोजदांरीवर काम करणारे मजूर अशांना म्हातारपणी निवृत्तीवेतन मिळण्याची सोय झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *