सणासुदीच्या काळात सोने-चांदीला तेजीची झळाळी ;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 29 ऑगस्ट । करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर अर्थव्यवस्था हळुहळू खुली होत आहे. सणासुदीच्या हंगामात सराफांनी सोने खरेदीवर भर दिल्याने कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या भावात तेजी दिसून आली आहे. कमॉडिटी बाजारात सोने ३०० रुपयांनी तर चांदी १००० रुपयांनी महागली.

नफावसुली आणि भांडवली बाजारातील तेजीचा फटका सोने आणि चांदीला बसला होता. दोन्ही धातूंच्या किमतीत सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली होती. मात्र शुक्रवारच्या सत्रात सोने आणि चांदी तेजीने झळाळून निघाले. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव ४७५५७ रुपये आहे. त्यात ३२० रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४७५८२ रुपयांपर्यंत वाढला होता. एमसीएक्सवर शुक्रवारी बाजार बंद होताना एक किलो चांदीचा भाव ६४०७२ रुपयांवर स्थिरावला होता. त्यात १०२८ रुपयांची वाढ झाली.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६५० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४७६५० रुपये झाला आहे. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७१० रुपये इतका झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०९४० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४०८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१८० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७११० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९८१० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *